व्यसनमुक्तीचे शिवधनुष्य पेललेल्या डॉ. साधना राजाराम पाटील.
******************************************************************************************
- *********************************************
- *********************************************
- *********************************************
शिराळ्याच्या डॉ. साधना पाटील म्हणजे एक सर्वसामान्य गृहिणी. आपण भले की आपला संसार भला या भावनेने संसारात गुरफटून घेतलेल्या. अत्यंत उच्चशिक्षित. इंग्रजी व मानसशास्त्रातून पदवीधर झाल्या आहेत. एम. ए. बी. एड. झाल्या आहेत. स्कूल मॅनेजमेंटचा डिप्लोमाही केला आहे. इतक्या शिक्षणानंतरही त्या संसारात छानशा रमल्या होत्या, पण त्यांच्यातील सामाजिक उर्मी त्यांना गप्प राहू देत नव्हती. शेजारपाजारच्या बायका गप्पा मारायला घरात यायच्या, तेव्ध नवऱ्याच्या, मुलाच्या व्यसनाचा विषय हमखास निघायचा. कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या दारुच्या व्यसनापोटी आपली कशी ससेहोलपट होते हे भरल्या डोळ्यांनी आणि दाटल्या पशाने सांगायच्या. अशा पिचलेल्या, त्रासलेल्या महिलांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, याची रुखरुख साधना पाटील यांना लागून राहिली होती. आपल्या शिक्षणाचाच यासाठी पत्रयदा होऊ शकतो, याचीही जाणीव होत होती. त्यातूच मग शिराळ्यातील यशवंत व्यसनमुक्ती केंद्राचे स्फुल्लिंग चेतले. पती डॉ. राजाराम पाटील यांच शिराळ्यातच रुग्णालय आहे. तेथेच डॉक्टरांनी बसनमुक्तीची मुहूर्तमेढ रोवली, लाला डॉ. सायना पाटील यांनी ताकदीने साथ दिली. त्यांच्या या सामाजिक कामात पती ठामपणे पाठीशी राहिले, गोरगरीब, प्रासलेल्या महिलांसाठी डॉ. साधना पाटील यांचे व्यसनमुक्तत्र केंद्र म्हणजे आशेचा किरण देणारे ठरले. हळूहळू गर्दी नाटू लागली. महिला येऊ लागल्या.
व्यसनी नवरा अगू देत नाही, नारडमेड करतो, घरखर्चासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे देत नाही', अशी गाऱ्हाणी सांगू लागल्या. अशा खचलेल्या, हार मानलेल्या महिलांसाठी डॉ. साधना यांचे काम सुरू झाले. व्यसनमुरत्रिवावत त्यांच्याशी चर्चा करू लागल्या. त्यांच्या दुखाची तीव्रता कमी करण्याचा प्रामाणिक प्रयन करू लागल्या, तुमच्या मनाची तयारी असेल आणि कुटुंबाचे सहकार्य असेल, तर तुमच्या नवन्याचे व्यसन आपण थांबवू, असा विश्वास देऊ लागल्या, नवा आत्मविश्वास मिळालेल्या महिला व्यसनी नक्याला घेऊन समुपदेशनासाठी त्यांच्याकडे येऊ लागल्या, शास्त्रशुद्ध तंत्रशुद्ध आणि भावनिक उपचार करत डॉ. साधना यांनी व्यसनी पुरुषांना व्यसनाच्या जाळ्यातून बाहेर येण्यासाठी हात द्यायला सुरुवात केली. काही जणांचा प्रतिसाद मिळायचा, तर काहींसाठी वेगवेगळे हातखंडे वापरावे लागायचे. त्यांची प्रभावी उपचार पद्धती, समुपदेशनाचे कौशल्य आणि पीडित महिलांच्या इच्छाशक्तीच्या बळावर यश येऊ लागले. व्यसनाने आपल्याच कुटुंबाची माती होतेय, हे लक्षात आलेली पुरुषमंडळी व्यसनाच्या डोहातून बाहेर येऊ लागली. कोणी चार-सहा महिन्यांत बाहेर आला, तर कोणाला सहा-आठ महिने लागले. पण समुपदेशनाला फळे मिळू लागली.
डॉ. साधना पाटील यांची उपचार पद्धती पाहता पाहता शिराळा, वाळवा, शाहूवाडी तालुक्यांत चर्चेत आली. कोणतीही जाहिरात किंवा चुकीची प्रॅक्टेिस न करता त्यांनी व्यसनाथिनांना माणसात आणायला सुरुवात केली. यश येत गेले, तसे लोकही येत गेले. आतापर्यंत त्यांनी १६ हजारहून अधिक कुटुंबांचे समुपदेशन केले आहे. त्यापैकी तब्बल १४ हजारहून अधिक जणांनी व्यसनाला कायमचा रामराम ठोकला आहे.
डॉ. साधना पाटील यांच्या मते कोणत्याही देशाचे भवितव्य आणि प्रगती देशातील तरुणाईवर अवलंबून ज्ञा असते. सध्या सोशल मीडियाचा सुक्त्राचा प्रभाव, आदर्श वाटणाऱ्या कलाकारांकडून केल्या जाणाऱ्या मादक पदार्थांच्या जाहिराती, पियर प्रेशर ग्रुप म्हणजेच समवयस्कांचा प्रभाव, बदलती जीवनशैली, एकटेपणा, ताणतणाव, वास्तव न स्वीकारण्याची वृत्ती या सर्व प्रतिकूल बाबींमुळे व्यसनाधिनता वाढत आहे. मानसिकदृष्ट्या सक्षम नसलेली तरुणाई पटकन व्यसनाकडे खेचली जाते. या स्थितीत आमच्यासारख्या समुपदेशकां पुढील आव्हाने वाढत आहेत. दररोज नवनव्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांत आमच्या प्रयत्नांना यश येत असून, व्यसनाधीन होणाऱ्या व्यक्तींचा वयोगट कमी होऊ लागला आहे, ही मोठ्या समाधानाची बाब आहे. एक माणूस जेव्हा दारूचा एक घोट घेतो, तेव्हा तो फक्त दारूच पित नाही, तर त्या प्रत्येक घोटासोबत आपल्या आईचा आनंद, वडिलांची प्रतिष्ठा, बायकोची मनःस्थिती आणि लेकरांची स्वप्रे एका घोटात संपवतो. देशातील तरुण पिढी चुकीच्या मार्गाने गेली, तर त्यांचे आयुष्य अंथ कारमय होते. दारू, गुटखा, तंबाखू, विडी, सिगारेट अशा अनेक नशा करून तरुण पिढी शारीरिकदृष्ट्या कमकुवत होत आहे. अगदी १८. १९ वर्षे वयोगटातील मुलंही वाया जात आहेत. त्यांना पुन्हा मार्गावर आणण्यासाठी आपल्याला एक पाऊल उचलावेच लागेल. सध्याच्या समाजसुधारकांपुढील हे मोठे आव्हान आहे. या आव्हानाला पेलण्याचा एक प्रयत्न आम्ही यशवंत व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून करत आहोत.
डॉ. साधना सांगतात, व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांच्या चेहल्यावरील आनंद पाहून समाधान वाटते. आपण केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे पाहून धन्यता वाटते. हे काम सुरू ठेवले पाहिजे ही प्रेरणा मिळते. नव्या ऊर्जेसह आजही आमची वाटचाल सुरूच आहे. एखाद्या व्यसनमुक्त पुरुषाच्या पत्नीला जेव्हा आपल्या जुन्या जखमा विसरून पुन्हा जगावंस वाटतं, एखाद्या मातेला आपल्या व्यसनमुक्त मुलाचा अभिमान वाटतो, तेव्हा आपण केलेल्या कार्याची पावती मिळाली, असे वाटल्यावाचून राहात नाही. वडिलांनी व्यसन सोडल्याच्या जाणिवेने मुलाच्या चेहऱ्यावरील काळकुट्ट मळभ दूर होऊन आनंदाच्या कोवळ्या उन्हात त्याचं बालपण उजळून निघतं, तेव्हा आमच्या व्यसनमुक्ती केंद्राचा हेतू सफल झाला, असे वाटते.